
सावंतवाडी : गुरूपौणिमेच्या निमित्ताने शालेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी माडखोल येथील साई मंदिरातील साई पालखीचे आगमन झाले. यावेळी मंत्री केसरकर यांनी साईंच्या पादुकांची विधीवत पुजा केली. यावेळी सावंतवाडी शहरातील तसेच आसपासच्या परिसरातील साई भक्तांनी पालखी, पादुका दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी मंत्री केसरकर यांच्या निवासस्थानी गुरूपौणिमेस पालखी येते. शनीवारी सायंकाळी ही पालखी त्यांच्या निवासस्थानी आली असता केसरकर यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली.