
चिपळूण : १९ फेब्रुवारी २०२५ सगळीकडे शिवजयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. पण कोकणातील अग्रगण्य सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कलामहाविद्यालयात शिवजयंती कलात्मक पद्धतीने साजरी करण्यात आली या प्रसंगी कलामहाविद्यालयाचा कलाशिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यावर विद्यार्थ्यांनी पोवाडे भाषणे केली. महाराजांना मानवंदना म्हणून महाराजांच्या जीवनावर आधारित मुलांनी चित्रे काढली. त्यातून मोठ्या गटातून अद्वज चव्हाण -प्रथम, सौरभ साठे -द्वितीय, प्रथमेश गोंधळी -तृतीय, सिद्धार्थ भोवड -उत्तेजनार्थ, छोट्या गटातून -भूषण वेलये -प्रथम, साहिल परुळेकर -द्वितीय, ज्योती पांचाळ -तृतीय, भार्वी गोरुले -उत्तेजनार्थ.हि पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.मुलांनी केलेल्या चित्राचे प्रदर्शन आठ दिवस कलामहाविद्यालयाच्या कलादालनात सर्व कलारसिकांसाठी खुले आहे तरी सर्वांनी याचा भेट देऊन आस्वाद घ्यावा असे आवाहन कलामहाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी केले आहे.