कवी सफरअली इसफ यांना सह्याद्री साहित्य काव्य पुरस्कार

Edited by:
Published on: September 05, 2025 11:57 AM
views 37  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या दर्या प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहासाठी 'सह्याद्री साहित्य काव्य पुरस्कार' प्राप्त झाला असून चिपळूण येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर काव्य पुरस्काराने कवी इसफ यांचा गौरविण्यात आला.

चिपळूण येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृह येथे चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सह्याद्री समाचारतर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी कादंबरीकार प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, कवी भालचंद्र सुपेकर, सह्याद्री समाचारचे प्रमुख शाहिर शाहिद खेरटकर, माजी सैनिक संतोष मोहिते, प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ. गोपीचंद वाघमारे आदी उपस्थित होते.

कवी सफरअली इसफ यांचा अल्लाह ईश्वर हा काव्यसंग्रह बहुचर्चित असून यापूर्वी या काव्यसंग्रहाचा समाज साहित्य प्रतिष्ठानचा प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार, प्रभा प्रकाशनाचा प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार, कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मस्तरांची सावली काव्य पुरस्कार,यशवंतराव चव्हाण काव्य पुरस्कार, वसंत- कमल काव्य पुरस्कार, सम्यक संबोधी काव्य पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात झाले आहे.त्यानंतर आता सदर कवितासंग्रहाचा सह्याद्री साहित्य काव्य पुरस्काराने या काव्यसंग्रहाचा गौरव करण्यात आला आहे.अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहाला ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखडे यांची प्रस्तावना लाभली असून त्यात ते म्हणतात, अल्लाह ईश्वर मधील कविता ही आजच्या धार्मिक उन्मादा विरोधाचा आवाज आहे. कवीला अनेक प्रसंगातून जावं लागलं आणि धर्माच्या आडून त्रास देणाऱ्यांनाही सहन करावे लागले. तरीही कवीने कवितेत कुणाबद्दलही अपशब्द व्यक्त केले नाही. अशी मानव्याची आस लागलेली कविता मराठी कवितेत दुर्मिळ अशी आहे. कवी सफरअली इसफ यांचे या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक चळवळीतून अभिनंदन करण्यात येत आहे.