10 वी परीक्षेत सह्याद्रीची घौडदौड

Edited by: मनोज पवार
Published on: May 14, 2025 19:50 PM
views 21  views

सावर्डे : कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी मार्फत मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्थेने भरघोस यश संपादन केले असून रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या  शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवलेला आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या 36 माध्यमिक विद्यालयातून1604 विद्यार्थी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी 1579 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सह्याद्रीचा शेकडा निकाल 98.44 इतका लागला आहे. सह्याद्रीच्या एकूण 36 माध्यमिक विद्यालयात पैकी 24 विद्यालयांचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा

सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेच्या आर्या नांदिवडेकरने 99 टक्के गुण मिळवून सह्याद्रीत प्रथम क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले आहे.याच विद्यालयाच्या आरोही क्षीरसागर 98.40टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तर गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डेच्या स्वरा सरमळकर व न्यू इंग्लिश स्कूल खेर्डीच्या दर्शन कदमने 97.80 टक्के गुण प्राप्त करून सह्याद्रीत विभागून तृतीय क्रमांक प्राप्त करण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. न्यू इंग्लिश स्कूल खेर्डीच्या सायली जाधव ने 97% गुण प्राप्त करून सह्याद्रीत चौथा क्रमांक पटकावला तर न्यू इंग्लिश स्कूल खेर्डीच्या ओम पवार व इंग्लिश मीडियम स्कूल खेर्डीच्या अध्याय सकपाळने 96.80% गुण प्राप्त करून सह्याद्री शिक्षण संस्थेत विभागून पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. सह्याद्रीच्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सलग प्रथम तीन क्रमांक पटकावण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. 

यशस्वी सर्व विद्यार्थी व संस्थेतील सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, संचालक शांताराम खानविलकर, चंद्रकांत सुर्वे, मारुतीराव घाग, मानसिंग महाडिक, आकांक्षा पवार, सचिव महेश महाडिक सर्व विद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण प्रेमी पालकांनी अभिनंदन केले आहे.