शिक्षकांचा निघणार सहकुटुंब मोर्चा...!

१४ डिसेंबर पासून बेमुदत संपाचा इशारा
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 22, 2023 12:53 PM
views 126  views

सिंधुदुर्ग : जुनी पेन्शन हा शिक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय असून या प्रमुख मागणीसह कंत्राटी भरती रद्द करा  यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक पुन्हा आंदोलन आणि बेमुदत संप पुकारत आहेत.सरकारी- निमसरकारी, शिक्षक -शिक्षकेतर व नगरपालिका-नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती,महाराष्ट्रची सभा बांधकाम भवन, मुंबई येथे संपन्न झाली. व 3 नोव्हेंबर रोजी शिक्षकांचा सहकुटुंब धडक मोर्चा व 14 डिसेंबर पासून बेमुदत संप असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी दिली.

कर्मचारी महासंघाचे  राष्ट्रीय सेक्रेटरी ए शिवकुमार यांनी सर्व संघटनांना आवाहन केले की, तुम्ही वेगवेगळे लढू नका.एका झेंड्याखाली या. तीन नोव्हेंबरच्या लढ्यात मोठ्या संख्येने सामील व्हा.मा.विश्वास काटकर यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समितीचे काम उत्तम् प्रकारे चालू आहे. संपाच आवाहन करताना जे नेकीचे आणि टेकीचे बरोबर घ्या.फुटणारे,दुसऱ्यांना दोष देणारे,सोबत घेऊ नका. माझे कुटुंब,माझी पेन्शन अभियान यशस्वि करण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले. 

शिक्षक आमदार मा. कपिल पाटील यांनी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे काम आदर्शवत असल्याचे नमूद केल.कच्चे दुवे चळवळीतले अडथळे असून अशा अडथळ्यांना सांभाळणं खूप गरजेचे आहे.आपली साथ कायम समन्वय समिती सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

3 नोव्हेंबर रोजी माझे कुटुंब,माझी पेन्शन व इतर जिव्हाळ्याच्या मागण्या बाबत राज्यव्यापी जिल्हा/तालुकानिहाय सहकुटुंब धडक मोर्चा*

14 डिसेंबर पासून  पुन्हा बेमुदत संपाचा इशारा

3 नोव्हेंबरला दिल्ली येथे होणाऱ्या संपास महाराष्ट्रातून  मोठ्या संख्येने शिक्षक कर्मचारी उपस्थित रहाणार

जर तुम्ही पेन्शन देणार नसाल मग माझ्यासहित माझं कुटुंब,नातेवाईक, हितचिंतक  मतदान करणार नाही

आंदोलनाला सहा महिने झाले तरी सकारात्मक निर्णय नाही. शासनकर्ते वाकुल्या दाखवीत आहेत.OPS साठी नेमलेल्या समितीने अहवाल सादर करून सुद्धानिर्णय नाही. त्यामुळे राज्यातील सर्व कर्मचारी प्रक्षुब्ध आहेत.OPS,NPS, आणि आता GPS ( गॅरेंटेड पेन्शन स्कीम) शासनाने आणली.मात्र कर्मचारी समन्वय समितीने जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावाने पाहिजे ही मागणी कायम असल्याचे सभागृहात जाहीर केले

खाजगीकरण,कपातीकरणं,कंत्राटीकीकरण,,शाळा दत्तक घेणे या गोष्टीला कडाडून विरोध करून 6 डिसेंबर चा GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

या सभेत प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर यांनी मनोगत व्यक्त केले.समितीच्या माध्यमातून राज्यभरात 15 जुलै,5 सप्टेंबर शिक्षक दिनी दोन टप्प्यातील आंदोलन करण्यात आली.तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन  नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाला विराट मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले  आहे.ज्या संघटना नेटाने , ठामपणे सक्रिय राहतील,कच खाऊन शेवटच्या टप्प्यात माघार घेणाऱ्यांना सोबत घेऊ नये. समन्वय समितीने घेतलेल्या निर्णयाला शिक्षक समितीचा पूर्ण पाठिंबा राहील असे जाहीर करण्यात आले.

या सभेत पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली.या सभेस अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय सेक्रेटरी ए शिवकुमार आणि राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वासजी काटकर यांनी मार्गदर्शन केले.शिक्षक आमदार कपील पाटील,दौंड साहेब,मध्यवर्ती संघटना अध्यक्ष अशोक दगडे,जि. प. कर्मचारी अध्यक्ष उमेश चिलबुले,जि.प.कर्मचारी प्रमुख बलराज मगर,न.पा.म.न.पा.महासंघ डॉ. डी एल कराड, कार्पोरेशनचे शशांक राव शिक्षकेतर कर्मचारी  आर बी सिंग,माध्यमिक शिक्षकेतर शिवाजी खांडेकर,प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगांवकर,प्राध्यापक संघटना मुखोपाध्याय,शिक्षक भारतीचे सुभाष मोरे,चतुर्थ श्रेणी महासंघाचे भाऊसाहेब पठाण,माध्यमिक शिक्षक संघ सतीश इनामदार, आणि बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. किशोर पाटील,सत्यवान माळवे,तसेच अनेक संघटनांचे अध्यक्ष,सचिव,निमत्रक ,तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.