
सावंतवाडी : दिनेश विनोद माजगांवकर आणि कुटुंब, तळवडे पलीकडची खेरवाडी ग्रामस्थ आयोजित संगीत संध्या जुगलबंदीचा कार्यक्रम नव बालक नामकरण विधी समारंभ औचित्य साधून आयोजित केला होता. संकल्पना श्री अजित पोळजी यांची होती.
यामध्ये गायक हर्षल मेस्त्री , चिन्मय प्रभूराळकर, कौस्तुभ धुरी, शांताराम मुनणकर यांनी आपल्या बहारदार आवाजाने आणि गायन शैलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच पखवाद साथ सचिन पांगम आणि तबला साथ ओंकार मेस्त्री यांनी ताल ठेक्यावर रसिकांची मन जिंकली. एकूणच कार्यक्रम वाखाणण्याजोगा होता. यावेळी सर्व कलाकारांचा सन्मानचिन्ह सत्कार करण्यात आला. सुधीर राऊळ यांनी उत्तम साऊंड सिस्टीम देऊन कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहचवले.
अशा प्रकारचे संगीत जुगलबंदी, मैफिल, भजने पाहिजे असतील तर अजित पोळजी (9764922627) यांना संपर्क साधावा जेणेकरून संगीत सेवा, कला घराघरात पोहचेल असे आवाहन अजित पोळजी यांनी या कार्यक्रम सोहळ्यामध्ये गुरुकुल संगीत संस्थाच्या माध्यमातून केले.