दोडामार्ग व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी सागर शिरसाट

Edited by: संदीप देसाई
Published on: January 28, 2024 05:40 AM
views 190  views

दोडामार्ग : दोडामार्ग व्यापारी संघाच्या शहर बाजार पेठेतील व्यवसायिक सागर शिरसाट यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी संतोष दिनकर नानचे व दिलीप वासुदेव आसोलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दोडामार्ग येथील पिंपळेश्वर सभागृहात शनिवारी व्यापारी संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीला शहरातील व्यापारी उपस्थित होते. व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष लवू शांताराम मिरकर यांचे आकस्मिक निधन झाले नंतर ह पद रिक्त होते. तर येत्या ३१ जाने ला मालवण येथे यंदाचा जिल्हास्तरीय व्यापारी मेळावा असल्याने व्यापारी संघ दोडामार्गने ही बैठक आयोजित करून नवीन कार्यकारिणी निवड केली.

बैठकीच्या सुरवातीलाच नवीन  कार्यकारणी निवडी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी सागर शिरसाट यांचे नाव अध्यक्षपदासाठी एकमताने सुचविण्यात आल्याने त्यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. नूतन कार्यकारीणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष -सागर शिरसाट, उपाध्यक्ष-संतोष नानचे व दिलीप आसोलकर, सचिव-प्रशांत वसंत नाईक, खजिनदार-मोहन अनंत मणेरीकर, तर सदस्य पदी पांडुरंग आत्माराम बोर्डेकर, प्रणय रमेश मोरजकर, श्यामसुंदर जयवंत चांदेलकर, विलास लक्ष्मण मिरकर, विशांत सूर्यकांत परमेकर, शैलेश वासुदेव गोवेकर, दिनेश विद्यानंद मोरजकर, मोहन जगन्नाथ गवंडे, राजन दिनकर नानचे, सुमंत सुधाकर मणेरीकर, उदय लिंगाप्पा हेरेकर, बाळकृष्ण धोंडू राणे, अशोक नारायण शिरोडकर व नितीन नारायण गवस यांची निवड करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भेडसावणाऱ्या या समस्या तडीस नेण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नुतन अध्यक्ष सागर शिरसाट यांनी सांगितले आहे.