
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक प्रधान कार्यालय येथे सेवेत असलेले कर्मचारी व कणकवली निम्मेवाडी येथील सागर गणेश राणे, वय ३७ यांचे आज सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने तीव्र झटक्याने दुःख निधन झाले.
सागर राणे यांचा मनमिळावू स्वभाव होता,जिल्हा बँक कर्मचाऱ्यांमध्ये ते कायम मिळून मिसळून राहायचे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे. त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्व कर्मचारी यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.










