
सावंतवाडी : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सगळेच राजकीय पक्ष आणि पदाधिकारी मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. बऱ्याच ठिकाणी आरक्षण बदलामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अनेक पक्षही नव्या चेहऱ्यांची चाचपणी करत आहेत. दरम्यान, आरोंदा मतदार संघात युवा चेहरा म्हणून सागर सोमकांत नाणोसकर यांच्या नावाला जनतेमधुन प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक लढवण्यासाठी स्थानिक पातळीवर दबाव वाढत आहे. एक सुशिक्षित, अभ्यासू युवा नेतृत्च म्हणून सागर नाणोस्कर यांच्याकडे पाहिलं जाते.