
सावंतवाडी : दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील स्वराज्य संघटनेच्यावतीने शिवजयंती निमित्त भव्य दिव्य अशी रॅली ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली. उंट, घोडे व भगव्या वादळात सहभागी झालेल्या दुचाकीस्वारांसह शिवकालीन देखावे लक्षवेधी ठरले. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात ऐतिहासिक सावंतवाडी शहर दुमदुमून गेल होत. सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
राजेसाहेब खेमसावंत-भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी राणीसाहेब शुभदादेवी सावंत-भोंसले, युवराज लखमराजे सावंत-भोसले, युवा उद्योजक विशाल परब उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, उंट, घोडे, ऐतिहासिक वेशभूषा, भगवे ध्वज, भगवे फेटे परीधान केलेले दुचाकीस्वार, शिवकालीन देखावे यांसह नरेंद्र तारी यांच्या मेड फॉर यूच्या गो कार्टींग कार रॅलीत लक्षवेधी ठरल्या.
(सर्व छाया : अनिल भिसे)
जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात निघालेल्या रॅलीमुळे भगव वादळ शहरात अवतरल होत. शिवप्रेमींचा तुफान प्रतिसाद या रॅलीस लाभला. संपूर्ण शहरातून ही रॅली मार्गस्थ झाली. याप्रसंगी स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष अमोल साटेलकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, माजी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, श्रीपाद सावंत, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, दिलीप भालेकर, पिंट्या देसाई, अँड. अनिल केसरकर, अमित वेंगुर्लेकर, नंदू तारी, कृष्णा धुळपणावर, गौतम माठेकर, संदीप निवळे, बाबा आल्मेडा, अजित सांगेलकर, श्री. गावडे, विजय कदम, अखिलेश कोरगावकर, तेजस शिरवलकर आदींसह शेकडो शिवप्रेमी या रॅलीत सहभागी झाले होते.