
वैभववाडी : सडुरे - शिराळे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा जिल्हा भटक्या विमुक्त सेलचे नवलराज काळे पत्नीसह विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक २ मधून विशाखा काळे तर ३ मधून नवलराज काळे हे विजयी झाले आहेत. पती - पत्नी दोन्ही ग्रामपंचायतीचे सदस्य बनले आहेत.
सडुरे - शिराळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह सदस्य पदांच्या तीन जागांसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये काळे कुटुंबातील पती - पत्नी दोन वेगवेगळ्या मतदारसंघातून उभे होते. प्रभाग २ मधून विशाखा काळे यांनी विरोधी उमेदवार स्वप्नाली काळे यांचा पराभव केला. विशाखा यांना १०१ तर स्वप्नाली यांना ४६ मते मिळाली आहेत. तसेच प्रभाग ३ मध्ये नवलराज काळे १२६ तर रविराज काळे २६ अशी मते मिळाली. या दोन्ही प्रभागात एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये निवडणूक झाली होती. मात्र या लढतीत नवलराज काळे सरस ठरले. त्यांनी आपल्यासह पत्नीला विजयी केले.