प. पू. सद्गुरू समर्थ श्री अवधूतानंद महाराजांचा 'आनंद सोहळा' !

Edited by: विनायक गावस
Published on: October 05, 2023 18:41 PM
views 112  views

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल येथील प. पू. सद्गुरू समर्थ श्री अवधूतानंद महाराज यांचा १०० वा जन्मोत्सव "आनंद सोहळा" मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. श्रींच्या पुण्यक्षेत्री माडखोल धवडकी येथे हा सोहळा साजरा होत आहे. बुधवारी पहाटे काकड आरती, श्रीच्या समाधीची महापूजा व अथर्वशीर्ष अभिषेक, नामस्मरण, हरिपाठ व बावनी, सकाळी ह. भ. प. शरद बुवा घाग, नृसिंहवाडी यांचं कीर्तन मध्यान्ह आरती व महाप्रसाद पार पडला. तर सायंकाळी श्रींचा पालखी सोहळा श्री क्षेत्र दाणोली ते श्री क्षेत्र माडखोल पर्यंत पार पडला.

रात्री "साटमसूत" प. पू. अवधूतानंद महाराजांचे नाट्यमय जीवनचरित्र असे विविध कार्यक्रम पार पडले. गुरुवारी प. पू. अवधूतानंद महाराजांचा १०० वा जन्मदिवस साजरा करण्यात आला.