सद्गुरू मियांसाब पुण्यतिथी सोहळा २ जुलैला !

Edited by: विनायक गांवस
Published on: June 26, 2024 09:02 AM
views 661  views

सावंतवाडी : शहरातील प.पू. श्री. सद्‌गुरू मियांसाब यांचा ७९ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा मंगळवार २ जुलै रोजी योगिनी एकादशी दिवशी त्यांच्या समाधीस्थळी साजरा होणार आहे. 

सकाळी आठ ते दहा वा. सद्गुरू पूजन, दहा ते दुपारी बारा वा. श्रींची प्रार्थना, नामस्मरण, समाधीला चादर अर्पण करणे, दुपारी बारा ते तीन महाप्रसाद, तीन ते सायंकाळी सहा या वेळेत नामस्मरण व कीर्तन सायंकाळी सहा ते रात्री आठ वेळेत एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी वाचन, रात्री दहा ते बारा वाजता भजन, हरिपाठ व आरतीने उत्सव पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार आहे. भाविकांनी पुण्यतिथी उत्सव सोहळ्यास उपस्थित राहवे असे आवाहन कमिटीतर्फे अध्यक्ष वसंत राणे, उपाध्यक्ष सतीश शिरोडकर, खजिनदार शैलेश पै, सचिव उमेश कोरगावकर व सरचिटणीस प्रसाद अरविंदेकर यांनी केले आहे.