
वेंगुर्ला : जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांचा वाढदिवस सप्तसागर कार्यालय येथील शिवसेना कार्यालयाच्या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना, भाजप पक्ष, रोटरी क्लब, खर्डेकर महाविद्यालय प्राचार्य, प्राध्यापक यांच्यासाहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
आज ३० ऑक्टोबर रोजी सकाळी सचिन वालावलकर यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वालावलकर यांच्या दोन्ही मुली स्वानंदी व स्वरा तसेच माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, भाजप तालुकाप्रमुख सुहास गवंडळकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सुषमा प्रभूखानोलकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, दादा केळुस्कर, गणपत केळुसकर, शिवसेना जिल्हा संघटक सुनील डूबळे, शहरप्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, सुनील मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. चौगले, सुरेंद्र चव्हाण, रोटरी क्लब अध्यक्ष योगेश नाईक, राजू वजराटकर, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, देवा कांबळी, प्रणव वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, संदीप पाटील, कौशिक परब, संजय परब, नयन पेडणेकर, दत्ता साळगावकर, अमित गावडे यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.