
वेंगुर्ला : गणेश चतुर्थी निमित्त दरवर्षीप्रमाणे वेंगुर्ले शहर कार्यक्षेत्रातील कुटुंबांना शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्यामार्फत गणेश पूजन साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ शिवसेना कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, सचिन देसाई युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, विभागप्रमुख नयन पेडणेकर, अमित गावडे, संजय परब, युवासेना शहरप्रमुख सागर गावडे आदी उपस्थित होते.