
सावंतवाडी : वेंगुर्ला येथील अंडरग्राऊंडसाठी उभारलेल्या पॅनलचा त्रास नागरिकांना होत असल्याचा आरोप सचिन वालावलकर यांनी केला. आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महावितरणच्या बैठकीत श्री. वालावलकर यांनी वेंगुर्ला तालुक्यातील वीज समस्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिशाभूल केल्यान श्री. वालावलकर आक्रमक झाले. ट्रान्सफॉर्मरसाठी पैसे मंजूर होऊन ते का होत नाहीत? कोट्यावधी रूपये दीपक केसरकर यांनी दिलेले असताना काम होत नसल्याची तक्रार त्यांनी केली. आमच्या सारख्यांची महावितरण वीज अधिकारी दिशाभूल करत आहे. अधिकाऱ्यांना ग्राऊंडवरची माहिती नाही असंही श्री. वालावलकर म्हणाले. यावेळी आम. केसरकर यांनी मध्यस्थी करत यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच रेल्वे स्थानक येथील ट्रान्सफॉर्मर का बदलला गेला नाही ? असा सवाल आम. केसरकर यांनी केला.