युवासेना उपतालुकाप्रमुख पदी सचिन नार्वेकर

Edited by:
Published on: January 09, 2024 19:18 PM
views 236  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका युवासेना उपतालुकाप्रमुख पदी खानोली येथील युवा नेतृत्व सचिन नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, तालुका संघटक बाळा दळवी, सुनील सादजी यांच्यासाहित शिवसैनिक उपस्थित होते.