
कणकवली : यावर्षी न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट येथे पार पडलेल्या कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024-25 मध्ये एस.एम. हायस्कूल,कणकवलुच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक गटात विशेष चमक दाखवली आहे. माध्यमिक गटात पूर्वा संतोष सावंत हिला निबंध स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त झाला तर वकृत्व स्पर्धेत आर्या किशोर कदम हिला सुद्धा द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
या विज्ञान प्रदर्शनात सहभागी व यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे कणकवली शिक्षण संस्था कणकवली चे कार्याध्यक्ष एस. एन. तायशेटे, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष एम.ए. काणेकर त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक जी.एन. बोडके, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.