एस एम मडकईकर यांच्या नव्या दालनाचा शुभारंभ

नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती
Edited by: विनायक गावस
Published on: November 06, 2023 21:00 PM
views 203  views

सावंतवाडी : सावंतवाडी व कुडाळ येथील सुप्रसिद्ध एस.एम.मडकईकर ज्वेलर्सच्या नव्या दालनाचा शुभांरंभ भाजप युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला‌. उभाबाजार रघुनाथ मार्केट समोर हे नवं दालन सुरू करण्यात आले आहे.


सोमवारी भाजप युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या दालनाचा शुभारंभ करण्यात आला. मडकईकर यांची सावंतवाडी आणि कुडाळ मध्ये एक ग्रॅमच्या दागिन्यांची दालने असून ग्राहकांच्या उदंड प्रतिसादानंतर सावंतवाडीत प्रशस्त जागेत त्यांनी नव दालन सुरू केलं आहे. गोवा महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने, एक ग्रॅम गोल्डचे दागिने यांसह दागिन्यांसाठीची हत्यारे या ठिकाणी उपलब्ध आहेत. रघुनाथ मार्केट समोरील या नव्या दालनाला ग्राहकांनी भेट द्यावी असं आवहान मडकईकर कुटुंबियांकडून करण्यात आल आहे.

याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप नेते महेश सारंग, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, शामसुंदर मडकईकर, वसुंधरा मडकईकर,विराग मडकईकर, वैष्णवी मडकईकर, पराग मडकईकर, प्रियांका मडकईकर आदी उपस्थित होते