
कणकवली : राष्ट्रसेवा दल आणि अन्नपूर्णा परीवार संयुक्त विद्यमाने सानेगुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त इ. ९ वी ते इ. १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी सानेगुरुजी प्रेरणा प्रकल्प राज्यस्तरीय स्पर्धेचे साने गुरुजी स्मारक, सिंहगड, पुणे याठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एस्. एम्. हायस्कूल, कणकवलीची कु. मनाली प्रसन्ना देसाई (इ. ९ वी) हिच्या प्रकल्पाची कोकण विभागातून विशेष उल्लेखनिय प्रकल्प म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी तिला पारीतोषिक वितरण समारंभात रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी वैदय यांचेहस्ते सन्मानित करण्यात आले.
तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल कणकवली शिक्षण संस्था, कणकवलीचे डॉ. एस.एन. तायशेटे (कार्याध्यक्ष) डी. एम. नलावडे (सचिव) एम. ए. काणेकर (उपकार्याध्यक्ष) जी. एन. बोडके (मुख्याध्यापक) आर. एल. प्रधान (उपमुख्याध्यापक) जी. ए. कदम (पर्यवेक्षक) सर्व शिक्षक वृंद, सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे. कु. मनाली देसाई हिला या प्रकल्पासाठी श्रीमती. एस. सी. गरगटे (सहा. शिक्षिका) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.