
देवगड : जिल्हा स्तरीय युवा महोत्सवात श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाने चमकदार कामगिरी केली असून नेत्रदीपक यश मिळवले आहे. क्रीडा व युवक संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित जिल्हा क्रिडा युवा महोत्सव २०२५ मध्ये शिक्षण विकास मंडळ, देवगड संचलित श्री. स. ह. केळकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
सांघीक कला प्रकारामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल नृत्य हे लोकनृत्य सादर करून प्रथम पारितोषिक पटकाविले व गौर गीत हे लोकगीत सादर करून तृतीय पारितोषिक मिळवले. वैयक्तिक काव्य लेखन या कला प्रकारामध्ये कु. शिवमणी पाळेकर याने द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. या तिन्ही कला प्रकारात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांची तसेच परीक्षकांनी मान्यवरांची मने जिंकली.
या स्पर्धेमध्ये साहिल, दीपक जाधव, विनीत शांताराम चव्हाण, शिवमणी अजय पाळेकर, प्रफुल प्रकाश हजारे, योगीराज चंद्रशेखर नार्वेकर हे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच लोकनृत्य आणि लोकगीत सादर करणारे विद्यार्थी, साहिल दिलीप जाधव, तनिष हिराजी नाईक, अभिषेक चारुदत्त शिंदे, साईनील सुनील धुरे, पार्थ प्रसाद नाईकधुरे या विद्यार्थ्यांनी सादर केले. या सर्व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि कलागुणांचे महाविद्यालयातर्फे विशेष कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शिक्षण विकास मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी विद्यार्थी आणि सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले व वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.










