एस. बी. राणे हायस्कूलमध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना स्टडी ॲपचे मोफत वाटप

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 21, 2023 19:33 PM
views 150  views

देवगड :  देवगड तालुक्यातील एस बी .राणे हायस्कूल नारिंग्रे या प्रशालेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ भिवंडी, रुरल या संस्थेच्या वतीने स्टडी ॲप् चे मोफत वाटप करण्यात आले. पोयरे गावचे सुपुत्र सत्यवान हरी पाटील व सौ श्रद्धा पाटील यांच्या प्रयत्नातून हे वाटप करण्यात आले आले.

नारिंग्रे सारख्या ग्रामीण भागात सन 1960 सालापासून नारिंग्रे शिक्षण संस्था ,मुंबई संचलित एस .बी .राणे हायस्कूल, ज्ञानदानाचे काम करत आहे . प्रशालेचे अनेक माजी विद्यार्थी मोठमोठाल्या अधिकारी पदावर काम करत आहेत. प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम वेळोवेळी राबविले जातात. गुणवत्ता वाढीसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग घेतले जातात .याचाच एक भाग म्हणून सेक्रेटरी व्ही.डी. राणे यांच्या विनंतीवरून रोटरी क्लब ऑफ भिवंडी, रुरल यांनी हा उपक्रम आयोजित केला होता .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक ,सुधाकर मंडलेसर यांनी भूषविले .

यावेळी पोयरा गावचे पोलीस पाटील , संतोष केसरकर, प्रकाश पाटील, मोठ्या संख्येने पालक , विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन शिवनगेकरसर यांनी केले. सत्यवान पाटील आणि विज्ञान शिक्षिका सौ.मुग्धा भावे यांनी मुलांना ॲप डाऊनलोड करून ते वापरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले . मुख्याध्यापकांनी संस्था ,शाळा आणि विद्यार्थ्यांच्या वतीने रोटरी क्लबचे आभार व्यक्त केले.