ग्रामसभेत राडा ; रुपेश पावस्कर - समद मुजावर यांची धक्काबुक्की

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 10, 2023 19:16 PM
views 1497  views

कुडाळ : नेरुर ग्रामपंचायत जलजीवन मिशन पाणीपुरवठा खास ग्रामसभेमध्ये पाणीपुरवठा कोणत्या विहिरीवरून करावा यासाठी रुपेश पावस्कर व समद मुजावर यांनी एकमेकांविरोधात शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण करण्याची धमकी दिल्या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शुक्रवार 9 सप्टेंबर रोजी नेरुळ ग्रामपंचायत येथे जल जीवन मिशन पाणीपुरवठा संदर्भात खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये रुपेश पावस्कर यांचे चुलते ज्ञानदेव पावसकर यांनी माझ्या विहिरीवर बसवलेली योजना काढून टाका व नवीन विहिरीवर नळ योजना सुरू करा व पाणीपुरवठा करा असे सांगितले यावर माजी उपसरपंच समद मुजावर यांनी तुम्ही असे कसे म्हणता आपण दोन्ही विहिरीवरून पाणीपुरवठा करू असे सांगितले यावर रुपेश पावसकर व समद मुजावर यांच्यात भांडण झाले याचे रूपांतर शिवीगाळ अंगावर धावत धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रुपेश पावस्कर  व समद मुजावर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात परस्पर तक्रारी दिल्या आहेत. रुपेश पावस्कर यांनी समद मुजावर यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार समद मुजावर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संमत मुजावर यांनी रुपेश पावस्कर यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार रुपेश पावस्कर यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली. याप्रकरणी पो. हे. कॉ मंगेश शिंगाडे अधिक तपास करत आहेत.