
मुंबई : कुडाळ तालुक्यातील उबाठा सेनेचे ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख रूपेश पावसकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आज प्रवेश केला. यावेळी माजी खासदार सुधीर सावंत, वर्षा कुडाळकर,सचिन वालावलकर यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
रुपेश पावसकर यांच्या शिवसेने प्रवेशामुळे उबाठा सेनेला कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठा धक्का बसला आहे. ओबीसीची सेलचे जिल्हाध्यक्ष असलेले रुपेश पावसकर यांनी आपल्याला पक्षात निर्णय घेताना प्रत्येक वेळी डावलले जात असल्याचा आरोप करत उबाठा सेना ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ते उद्धव ठाकरे गटावर सेनेमध्ये नाराज असल्याचे मानले जात होते. ते भाजपमध्ये जातील असा कयास बांधला जात होता. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केल्याने कुडाळ तालुक्यातील शिवसेनेचे वजन वाढले असल्याची चर्चा बोलली जात आहे.
ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष असलेले रुपेश पावसकर यांचे कुडाळ तालुका बऱ्यापैकी नेटवर्क आहे. त्यामुळे शिवसेना वाढीसाठी खूप मोठा फायदा होणार आहे.