रूपेश कांबळे MPSC ची कृषी अधिकारी परिक्षा उत्तीर्ण

Edited by: विनायक गावस
Published on: August 26, 2023 11:52 AM
views 778  views

सावंतवाडी : सावंतवाडी आगारातील सेवानिवृत्त चालक रतेश कांबळे यांचा सुपुत्र रूपेश कांबळे हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तालुका कृषी अधिकारी परिक्षा उत्तीर्ण झाला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून त्यान पदवी शिक्षण घेतलं. तर सावंतवाडी कळसुलकर इंग्लिश स्कूल व आरपीडी कॉलेजचा तो माजी विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.