
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर व सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी धडक दिली. रूग्णालयातील समस्यांसह रूग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारीबद्दल वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची भेट घेत लक्ष वेधलं.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांची भेट घेत लक्ष वेधलं. रूग्णालयातील समस्यांसह रूग्णांच्या नातेवाईकांकडून आलेल्या तक्रारींबद्दल त्यांनी अधिक्षकांच लक्ष वेधलं. गर्भवती महिलेच्या प्रसुती दरम्यान घडलेल्या प्रसंगाबाबत रोष व्यक्त केला. यावेळी वैद्यकीय अधिक्षकांनी घडलेल्या प्रकाराबाबत आठ दिवसात चौकशी करून माहिती देतो असं आश्वासन उपस्थितांना दिल. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील समस्या, रिक्त पदांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तर याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं मत काका कुडाळकर म्हणाले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष सर्वेश पावसकर, जिल्हा चिटणीस राजू धारपवार, अस्लम खतीब, अशोक पवार, रोहन परब, विजय कदम, तुषार मराठे, प्रकाश वर्मा या़सह रूग्णालयाचे डॉ. पांडुरंग वजराटकर, डॉ. मुरली चव्हाण आदी उपस्थित होते.