आरपीआय - आठवले गटाचं लाक्षणिक उपोषण

Edited by: संदीप देसाई
Published on: January 08, 2024 21:13 PM
views 187  views

दोडामार्ग : दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरची कायम स्वरूपी, पुर्णवेळ स्वतंत्र डॉक्टरची नियुक्ती करावी, पुरेसा औषध साठा आणि सर्वसामान्य नागरिकांना उत्तम उत्तम नागरिक आरोग्य सुविधा मिळाव्या या मागणीसाठी सोमवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या दोडामार्ग तालूका शाखेच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. या मागणीची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पुन्हा एकदा डॉ. एवळे यांसह अन्य चार डॉक्टरांची आठवड्याचे सहाही दिवस नियुक्ती केली आहे.

दोडामार्ग येथे स्त्रीरोगतज्ञ व वैदयकीय अधिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. ऐवळे याची अन्य ठिकाणी बदली झाली, परंतु त्यांच्या जागी पर्यायी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरची कायम स्वरूपी, पुर्णवेळ स्वतंत्र डॉक्टरची नियुक्ती न झाल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होते,  विशेषता गरोदर महिलांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तर आरोग्याच्या अन्य सुविधाही येथे मिळत नाहीत, रुग्णालयात औषधे मिळत नाहीत, अशा अनेक गैरसोयींचा सामना दोडामार्ग वासियांना करावा लागतो. दोडामार्ग येथील जनतेवर हा अन्याय आहे, अशी भूमिका घेत स्त्रीरोगतज्ञ व फिजिशियन अशा किमान दोन पूर्णवेळ व स्वतंत्र डॉक्टरांची कायमस्वरूपी व पूर्णवेळ नियुक्ती करण्यात यावी यासह अन्य तालुक्यातील विविध मागण्यासाठी आर पी आय पक्षाने दोडामार्ग तहसीलदार कार्यालयासमोर एक दीवशीय लाक्षणिक उपोषण केले.

 त्याच पार्श्वभूमीवर ६ जानेवारीला जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदूर्ग डॉ.एस.एच.पाटील यांनी रिपब्लिकन पार्टी ओफ इंडिया ( आठवले ) पक्षाचे राज्य सहसचिव रमाकांत जाधव, जिल्हा सरचितणीस प्रकाश कांबळे, तालुका अध्यक्ष रामदास राघोबा कांबळे व सखाराम कदम यांच्याशी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालायात प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. व वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती आदेश काढले असल्याची माहिती उपोषण कर्त्याना दिली.  यात डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे स्त्रीरोगतज्ञ, मंगळवार व शनिवार, डॉ. धिरज सावंत - स्त्रीरोगतत्र, सोमवार व गुरुवार, डॉ. संदिप सावंत - बालरोगतज्ञ, बुधवार, डॉ. गिरीष चौगुले - जनरल सर्जन, शुक्रवार अशी नियुक्ती करणेत आली आहे. मात्र या तात्पूरती सेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल थोडे फार समाधान व्यक्त करतो, मात्र दोडामार्ग तालुक्यात कायमस्वरूपी आणि पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध व्हावेत या मागणीवर ठाम राहत पक्षाच्या वतीने सोमवारी एक दीवशीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले.

या उपोषणात तालुका अध्यक्ष रामदास राघोबा कांबळे,तालुका सरचितणीस नवसो वसंत पावसकर,  जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे, तालुका उपाध्यक्ष मनोहर गोविंदा जाधव, प्रदीप बाळकृष्ण कदम, एकनाथ विठोबा कदम, राजन पांडुरंग कदम, जागृती जयंद्रत कदम, शशिकला शशिकांत कदम, चैताली चंद्रकांत कदम, मनीषा मनोहर कदम, सुमेधा सुरेश कदम, नेहा नवसो पावसकर, तृप्ती सुरेश जाधव, मनीषा मनोहर जाधव, प्रगती प्रकाश कांबळे, विनोद कदम, उत्तम जाधव, सुशील जाधव, कृष्णा महादेव कांबळे, महादेव बुधाजी जाधव, गंगा महादेव जाधव , सौ.उत्कर्षा उदय कदम आदी सहभागी झाले होते.