
सावंतवाडी : भारतीय सैन्य दलातील अग्निवीर म्हणून निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम घेतल्यास कोणतेही यश अशक्य नाही. विद्यार्थ्यांनी देशसेवेसोबतच आपले चारित्र्य, शिस्त व प्रामाणिकपणा जपावा, असे मत उपप्राचार्या डॉ सुमेधा नाईक धुरी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. संजना ओटवणेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील शिस्तबद्ध शिक्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन व संस्थेची मूल्याधिष्ठित परंपरा यांचा उल्लेख केला. तर अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अग्निवीर म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पर्यवेक्षक तसेच एन.सी.सी. अधिकारी नामदेव मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली देशसेवा व शिस्तचे धडे घेतलेले तसेच राणी पार्वतीदेवी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केलेला अग्निवीर कु.आविष्कार डिचोलकर, विद्यार्थी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना भावुक झाला. पियुश बर्डे आणि बाळा सावंत यांनी आपल्या यशामागील प्रेरणा, आणि शिक्षकांचे योगदान याबाबत अनुभव कथन केले. यावेळी निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि प्रेरणादायी संदेशासह संपन्न झाला.
याप्रसंगी माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच या कार्यक्रमास सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा.डॉ संजना ओटवणेकर, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, सांस्कृतिक कमिटी सदस्य प्रा. वामन ठाकूर, प्रा.जोसेफ डिसिल्वा, महाश्वेता कुबल, प्रा. विनिता घोरपडे, प्रा.डाॅ.अजेय कामत,प्रा.सविता माळगे, प्रा.रणजीत राऊळ, प्रा.पवन वनवे , प्रा.दशरथ सांगळे,प्रा.रणजित माने, प्रा.माया नाईक,प्रा.स्पृहा टोपले,प्रा.स्मिता खानोलकर, प्रा.प्रज्वला मोरजकर, प्रा.प्रांजल वाडकर, प्रा.विधीता गावंडे, प्रा.पुनम वाडकर, प्रा.निलेश कळगुंटकर , प्रा. राहुल कदम इ. सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सर्व शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी केले तर आभार प्रा.रणजीत राऊळ यांनी मानले.










