
कणकवली : मराठे ज्युनियर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल यंदा शंभर टक्के लागला आहे. शास्त्र विभागातून एकूण ४० विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उल्लेखनीय यशात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली आहे.
गुणक्रमानुसार विद्यार्थी:
प्रथम – तन्वी भिमराव प्रभावळकर (६८.५०%)
द्वितीय – रुद्रा ओमप्रकाश रासम (६१.६७%)
तृतीय – सेजल सुहास रासम (६१.३३%)
एकूणच मराठे ज्युनियर कॉलेजने शास्त्र विभागात १०० टक्के निकाल लावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.










