'आरपीडी’च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव !

Edited by: विनायक गावस
Published on: June 08, 2024 06:06 AM
views 154  views

सावंतवाडी: भविष्यातील ध्येयनिश्चिती विद्यार्थ्यांनी आजच करावी. आजच्या काळात अनेक शैक्षणिक सोयी सुविधा, भरपूर संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थी, पालकांनी जागृत राहून या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आपल्या आवडीच्या क्षेत्रातच कारकिर्द घडविली पाहिजे व भावी आयुष्य सुखी बनविले पाहिजे. गुणवत्तेत कोकण विभागाचा दबदबा आहे. परंतु, असेच यश स्पर्धा परीक्षांमध्येही मिळावे अशी अपेक्षा आहे असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांनी केले. आर.पी.डी. हायस्कूल व ज्यु. कॉलेजमधून मार्च २०२४ च्या एस.एस.सी व एच.एस.सी. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. 


आर.पी.डी. हायस्कूल व ज्यु. कॉलेजमधून मार्च २०२४ च्या एस.एस.सी व एच.एस.सी. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव. व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत संचालक चंद्रकांत सावंत, संदीप राणे ,श्रीम वसुधा मुळीक , श्रीम सोनाली सावंत तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड , उपमुख्याध्यापक पी.एम.सावंत , उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक , पर्यवेक्षक श्रीम संप्रवी कशाळीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

              

 प्रशालेत उच्च माध्यमिक विभागात तालुक्यात प्रथम विज्ञान शाखा राहुल झिलू गावडे , प्रशालेत द्वितीय राऊळ पार्थ प्रशांत , प्रशालेत संयुक्तपणे तृतीय रासम श्रावणी आनंद व कोटकर सलोनी संदीप तसेच वाणिज्य शाखा प्रथम भांगले वैष्णवी गोविंद ,द्वितीय नाईक धनेश राजाराम व तृतीय कुडतरकर आर्या पुरुषोत्तम याचबरोबर कला शाखेत प्रथम रेडकर खुशी संदीप , द्वितीय गावडे स्नेहल रविंद्र , तृतीय नाईक सेजल संजय तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातून प्रथम सावंत निलेश जगन्नाथ , द्वितीय गावडे वासुदेव सुनिल , तृतीय राऊळ दर्शन दिलीप या विद्यार्थ्यांसोबतच माध्यमिक विभाग इ. १० वीमधून प्रशालेत प्रथम राऊळ सिद्धी बबन , द्वितीय हरमलकर कुणाल प्रशांत , संयुक्तपणे तृतीय मसुरकर पवित्रा हेमंत व कोळंबेकर वेदा विश्वेश्वर याचप्रमाणे शालेय गुणवत्ता यादीतील इतर गुणवंत विद्यार्थी परब आदित्य प्रविण , कार्लेकर पार्थ राजशेखर , लोधी अनुष्का जगरामप्रसाद , सारंग समृद्धी महेंद्र , धोंड आर्यन जगदिश ,. परब बाळकृष्ण महेश ,. केनवडेकर श्रेयश श्रीपाद ,. गुरव कुशाली नामदेव , नार्वेकर श्रीश हरीश , मराठे मिहिर सतिश ,. लांबर सानिका संतोष , नाईक पूनम गंगाराम , गावडे विजय प्रकाश , श्रेयश गावडे , आकांक्षा राऊळ , मंथन गवस, सुकन्या पास्ते या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह , रोख रक्कमेची पारितोषिके व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालक-शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. पालकांच्यावतीने प्रशांत राऊळ व प्रवीण परब यांनी तर विद्यार्थ्यांमधून वैष्णवी भांगले , राहूल गावडे व कुशाली गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्राचार्य धोंड तसेच आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक व सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका श्रीम पूनम कदम यांनी केले.