
वेंगुर्ला : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन व ठाकूर कॅश्यू यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मठ येथील स्वयंभू मंदिर येथे होतकरू मुलींसाठी सायकल वाटप, ग्रामपंचायत कार्यालय मठ यांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, शाळा मठ नं १ येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक औषधांचे वाटप इत्यादी उपक्रम पार पडले.
यावेळी ठाकूर कॅश्युचे मालक यथा रोटरी वेंगुर्ला चे सभासद दीपक ठाकूर, रोटरी वेंगुर्लाचे अध्यक्ष शंकर उर्फ राजू वजराटकर, असिस्टंट गव्हर्नर संजय पुनाळेकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, रोटरी वेंगुर्ला सेक्रेटरी योगेश नाईक, उपाध्यक्ष प्रथमेश नाईक, ट्रेजरर पंकज शिरसाट, स्पोर्ट्स डायरेक्टर मुकुल सातार्डेकर, आनंद बोवलेकर, मठ सरपंच सौ. नाईक, उपसरपंच श्री गावडे, माजी सरपंच तुळशीदास ठाकूर, ग्रामसेवक श्री. केळुसकर, माजी केंद्रमुख्याध्यापक श्री कडुलकर, तसेच सर्वशाळांचे शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.