
देवगड : देवगड येथे आज रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी च्या वतीने कै.संजय धुरी यांच्या काव्य व कथा संग्रहाचे पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी कै.संजय धुरी यांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी आयोजित कै.संजय धुरी यांच्या काव्य व कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी. प्रमुख पाहुणे – PDG श्री. संग्राम पाटील, कोल्हापूर District- 3170
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद वसंत जोशी, वाडा, देवगड ( लेखक आणि शीघ्रकवीदेवगड) रोटे.सौ., उत्कर्षा पाटील रोटे.डॉ विद्याधर तायशेटे,रोटे.प्रेसिडेंट रोटे.प्रवीण पोकळे,रोटे.हनीफ मेमन,सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ जिल्हा अध्यक्ष प्रसाद पारकर,रोटे,आयुष धुरी,अनुप धुरी,आदी उपस्थित होते.या वेळी मनस्वी घारे यांनी स्व. संजय याच्या आवडीचे अटलजी चे काव्य सादर केले.व त्या यावेळी खूप भाऊक झाल्या.
एखाद्या बसल्या जागी काव्य करण्याची कै.संजय धुरी यांच्या अंगी असलेल्या काव्य लेखनाच्या कलेने भारावून गेलो व त्याने केलेल्या कथा, काव्य लेखनाचे प्रकाशन करण्याचे दिलेले वचन , दिलेला शब्द पूर्ण करू शकलो.यासारखा दुसरा कोणताही आनंद नसून या कथा काव्य संग्रहाचे प्रकाशन होत आहे.हीच त्यांना खरी ठरली आहे. असे प्रतिपादन रोटरी क्लब मँगो सिटी देवगड District -3170 चे PDG उद्योगपती रोटे.संग्राम पाटील यांनी जामसंडे येथे स्व.संजय काव्य कथा या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलताना केले.
देवगड मधील हरहुन्नरी व्यक्तिमत्व कवी लेखक स्व .संजय भालचंद्र धुरी आपल्यातून निघून गेले. देवगड चा भारदस्त आवाज अशी त्यांची सर्वत्र ख्याती होती. त्याचप्रमाणे त्यांना उपजत असलेली लेखनाची आवड वाचकांवर छाप पाडत होती. त्यांनी लिहिलेल्या काव्य तसेच कथा संग्रहाचे प्रकाशन व्हावे असे त्यांचे स्वप्न होते. तरी त्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी, देवगड, District- 3170 चे PDG उद्योगपती रो. संग्राम पाटील यांनी प्रकाशनाचे कामी पुढाकार घेऊन हे काम पूर्णत्वास नेले असून.
या काव्य व कथासंग्रहाचे प्रकाशन शनिवार दि. ६ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता. श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, जामसंडे या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष कवी प्रमोद जोशी यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांचे उपस्थितीत “संजयकथा ,काव्य ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी मान्यवरांचे स्वागत रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी चे वतीने करण्यात आले.रोटे.प्रेसिडेंट प्रवीण पोकळे यांनी प्रास्तविक करून संजयच्या स्मृतींना उजाळा दिला. मित्र राजू पाटील जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर रोटे. दादा कुडतडकर यांनीही आपले अनुभव कथन केले.
रोटे.डॉ विद्याधर तायशेटे यांनी आपल्या मार्गदर्शनात स्व.संजय धुरी यांचे स्मरणार्थ रोटरी चे माध्यमातून ब्लड स्टरेज युनिट,वॉटर एटीएम,रोटरी महोत्सव या सारखे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.आपल्या अध्यक्षीय भाषणात कवी प्रमोद जोशी यांनी पुस्तक प्रकाशन सोहळा हा शा उत्सव ,शब्द ब्रम्हाचा सोहळा आहे.असे सांगून संजय आणि आठवण, सहाण चंदन हे स्व.संजय धुरी यांचेवरील काव्य सादर केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी. उपस्थितांचे आभार रोटे.मनीषा डामरी यांनी मानले.