वैभववाडी युवा सेनेच्या तालुकाप्रमुखपदी रोहित पावसकर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 11, 2023 20:04 PM
views 61  views

वैभववाडी : वैभववाडी युवा सेनेच्या  तालुकाप्रमुखपदी रोहित पावसकर यांची निवड झाली. तसेच युवा सेना विभाग संघटक पदी संदेश सुतार, युवा सेना विभाग प्रमुख पदी मयूर दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांनी नवीन पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती पत्रे दिली.

    तालुक्यातील युवासेना कार्यकारिणीत खांदेपालट करण्यात आले. नविन चेह-यांना संधी देण्यात आली. सिंधूदुर्ग दौऱ्यावर आलेल्या वरुण सरदेसाई यांनी वैभववाडी युवा सेना कार्यकारिणी जाहीर केली. नविन युवकांना संघटनेत संधी दिली. आज या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिली.  यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक , उपनेते अरुण दुधवडकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवा सेना सरचिटणीस स्वप्निल धुरी, युवासेना उपजिल्हाधिकारी अतुल सरवटे, विभागप्रमुख गणेश पवार, उपतालुकाप्रमुख प्रविण काडगे, मंथन पांचाळ, जयेश पवार, कमलेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.