
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून कारिवडे येथे विशाल परब यांच्या माध्यमातुन शनिवार २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०९ ते संध्याकाळी ४ वाजता 'फिरता डिजिटल दवाखाना' शिबीर होणार आहे. 'आरोग्य आपल्या दारी' उपक्रमांतर्गत या अनोख्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शरीर तपासणी, हिमोग्लोबिन,कॉलेस्ट्रॉल, शरीर तापमान, रक्तदाब, हृदय तपासणी, ईसीजी, युरीन टेस्ट आदी प्रमुख चाचण्या करण्यात येणार आहेत. शंभरपेक्षा जास्त आरोग्य तपासण्या करण्यात येणार असून रुग्णांना दहा मिनिटात आरोग्य तपासणी रिपोर्ट देण्यात येणार आहेत. सदरची तपासणी ग्रामपंचायत कार्यालय कारिवडे येथे करण्यात येणार आहे. सदर शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपचे आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर यांनी आवाहन केले आहे.










