फोंडाघाट पेठेतील रस्ता- रुंदीकरण, गटार कामाचे पितळ पहिल्याच पावसात उघड

ग्रामस्थ संतप्त
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 27, 2023 11:27 AM
views 106  views

कणकवली : पावसाला दीड महिना उशिरा सुरुवात होऊन सुद्धा फोंडाघाट बाजारपेठेतील, केवळ सातशे मीटरचे रस्ता रुंदीकरण व गटार बांधणी पूर्ण न झाल्याने, पेठेत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच भर पावसात, म.गांधी चौकात तील घोणसरी रस्ता, खोदून गटाराचे पाणी काढल्याने, रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थिनीना आणि मासे मार्केट  मध्ये जाणाऱ्या ग्रामस्थांना, एकतर वळसा घालून अथवा चिखलातून कसरत करत त्रास सहन करावा लागत आहे.याचे खापर एम एस सी बी च्या पोल आडवा येत असल्याने फोडल्याचे समजते. याकडे नेहमी गतिमान कामासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल, ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.


 या बांधकामाकडे गावाचे नेतृत्व करणाऱ्या स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष सुद्धा लक्षणीय आहे.गावातील काही व्यापारी- घर मालक यांनी नुकसान भरपाई द्या, आणि काम पूर्ण करा अशी भूमिका घेतली. याबद्दल बांधकाम विभागाला पत्रव्यवहारही केला. मात्र काम सुरू होऊन सुमारे सहा महिने उलटले तरी साधेपत्राचे उत्तर .,चर्चा अथवा ठोस भूमिका घेतलेली नाही. तारीख २७ जूनला या संदर्भात बांधकाम  कार्यालयात चर्चेसाठी बोलावल्याची समजते. त्यामुळे यातून काय निष्पन्न होते ? तडजोड केलेल्या घरमालक व्यावसायिका प्रमाणे चर्चेत सहज साध्य होते ? की जैसे ते ठेवून समन्वय साधला जातो? कार्यकारी अभियंता सर्वगोड हे या चर्चेतून चातुर्याने, सर्वसमावेशक निर्णय घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.