
कणकवली : कासार्डे - उत्तर गावठण येथील पुलाजवळील रस्ता बुधवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक तसेच येण्या-जाण्याचा मार्ग ठप्प झाला. गेल्या काही दिवसांपासून कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जीर्ण झालेला कासार्डे पुलाजवळील रस्ता बुधवारी दुपारी अचानक कोसळला. उत्तर गावठणमधील ग्रामस्थांना याच ब्रिजवरून ग्रामपंचायत व इतर ठिकाणी ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.
रस्ता कोसळल्याची माहिती समजताच कासार्डे सरपंच निशा नकाशे, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय देसाई, कासार्डे तलाठी, ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामस्थांनी या रस्त्याकडे धाव घेत पाहणी केली. मार्ग बंद झाल्याने या मार्गावर उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.