झाड कोसळल्याने मार्ग ठप्प ; बांद्याचे उपसरपंच खतीब, सदस्य आगलावेंनी दाखविली तत्परता

Edited by: विनायक गावस
Published on: June 26, 2023 21:31 PM
views 147  views

सावंतवाडी : बांदा - वाफोली मार्गावर पाटकर बागेजवळ भलेमोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळल्याने हा मार्ग ठप्प झाला. उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे यांनी तात्काळ याठिकाणी धाव घेत एक तासानंतर झाड हटवून मार्ग वाहतुकीस खुला केला.आज सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याने आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले. सुदैवाने त्यावेळी वाहनांची वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिकांनी याची कल्पना उपसरपंच खतीब यांना दिली. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्या तनुजा वराडकर उपस्थित होत्या.