
देवगड : देवगड तालुक्यातील दहिबाव येथील ग्रामहसूल अधिकारी ऋतुजा चौघुले यांची महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेव्दारे महाराष्ट्र राज्याच्या गृह सहाय्यक कक्ष अधिकारीपदी निवड झाली आहे.
दहिबाव ग्रामहसूल अधिकारी ऋतुजा चौघुले यांची निवड झाली आहे. या निवडी बद्दल तहसीलदार आर.जे.पवार यांनी त्यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला. याप्रसंगी शुभेच्छा प्रदान करताना मुहसूल नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,संजय गांधी योजना नायब तहसीलदार सुरेंद्र कांबळे, आयटी असिस्टंट बाजीराव व सर्व ग्राममहसूल अधिकारी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.
या निवडीबद्दल सत्कार करताना पवार यांनी त्यांना महसूल वशासकिय कामकाजा बाबत कानमंत्र दिला. तसेच दहिबांव सारख्या मोठया गावातील तलाठी सजाचा अनूभव पुढील शासकिय प्रवासात नक्कीच उपयोगी ठरेल असेही सांगीतले. यावेळी ऋतुजा यांना सर्वच सहकारी ग्राममहसूल अधिकारी यांनी शुभेच्छा देत कौतूक केले आहे.