
मंडणगड : रिपब्लकीन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने महाबोधी महावीहार बौध्दांच्या ताब्यात द्यावे, 1949 चा बुध्दगया टेम्पल अंक्ट रद्द करावा, बिहार राज्यात महाबोधी महाविहाराचे मुक्तीसाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या बौध्द भिक्कु व कार्यकर्ते यांच्यावर तेथील सरकार व प्रशासनाकडून सुरु असलेले अन्याय अत्याचार त्वरीत थांबवावेत, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, महाबोधिविहाराची नवीन समिती बौध्द भंते, (धर्मगुरु) यांनी बनविण्यात यावी आणि नकली बौध्दभंतेची गठीत झालेली समिती रद्द करण्यात यावी या चार प्रमुख मागण्यासाठी 17 मार्च 2025 रोजी मंडणगड तहसिल कार्यालयाचे बाहेर ठिय्या आंदोलन व एक दिवसाचे लाक्षणीक उपोषण करण्यात आले.
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने 10 ते 17 मार्च 2025 या आठ दिवसाचे कालावधीत पुर्ण देशात या विषयासाठी विविध प्रकारची आंदोलन करण्यात आली आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून मंडणगड येथे दलित मित्र दादासाहेब मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत या आंदोलनास भंते राहुलरत्न, भंते शांतीरत्न, भंते संबोधी, भंते पुर्ण, भंते संघराज, भंते मास्टर झेन, बौध्द इतिहास अभ्यासक डॉ. दिलीप काकडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
शांततामय मार्गाने झालेल्या या आंदोलनात रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, तालुका अध्यक्ष नागसेन तांबे, रामदास खैरे, संदेश खैरे, भगवान खैरे, सुरेश तांबे, जितेंद्र जाधव, किरण पवार, विजय खैरे, शंकर पवार, संकेत तांबे, संकेश कासारे, सचिन खैरे, सुमेध पवार, गौरव मर्चंडे, विधान पवार, सुशांत खैरे, रोशन धोत्रे, कल्पेश कासारे या पदाधिकाऱ्यांसह पार्टीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या विषयासंदर्भात रिपाइं तालुकाशाखेचेवतीने मंडणगड तहसिल कार्यालयाचे माध्यमातून देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल बिहारचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकरिता सदर मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे कार्यालयाचे मार्फत सादर करण्यात आले आहे. या निवेदनावर पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.