रिंगणची राज्यस्तरीय वक्तृत्वस्पर्धा

राज्यभरातल्या मुलांना ऐकण्याची संधी
Edited by:
Published on: December 15, 2023 13:10 PM
views 88  views

रिंगणची वक्तृत्वस्पर्धा कशासाठी तर तरुणांमधे संतविचारांचा जागर करण्यासाठी, असा आमचा 'व्हाय' आहे. विचार करणाऱ्या पोरांनी संतविचारांवर बोलावं. त्यानिमित्ताने अभ्यास करावा. आळंदीत यावं. त्यांच्याबरोबर आमचीही संतविचारांशी नाळ घट्ट व्हावी. यासाठी ही धडपड सुरू असते. 

यंदा स्पर्धकांचा प्रतिसाद मागील दोन वर्षांपेक्षाही भारी आहे. १२५ जणांची नावं आल्यावर नोंदणी थांबवली. प्रत्यक्षात यातले अंदाजे ८० स्पर्धक बोलतील, असा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुलं येणार आहेत. त्यांना ऐकण्याचं निमंत्रण देण्यासाठी ही पोस्ट. या रविवारी १७ डिसेंबरला* ठीक ९ वाजता स्पर्धा सुरू होईल. संध्याकाळी ६ पर्यंत तरी नक्कीच बक्षिस वितरण समारंभ सुरू असेल. या दरम्यान कधीही या. पण वेळ काढून या असं आवाहन करण्यात आलंय.  

डॉक्टर असूनही संतविचारांच्या अध्ययन अध्यापनात सर्वस्व अर्पण केलेले डॉकटरबाबा अर्थात *हभप डॉ. नारायण महाराज जाधव* उद्घाटन करतील. रिंगणच्या पाठीशी कायम उभे असणारे *राजीव खांडेकर, दत्ता बाळसराफ, विशाल तांबे* यांच्या हस्ते बक्षिस वितरण होईल. आळंदी - डूडुळगाव येथील शरदचंद्र पवार कॉलेजमध्ये हा उपक्रम होतोय.  याबाबत अधिक माहितीसाठी रिंगणचे  संपादक सचिन परब यांना ९९८७०३६८०५ l ९४२०६८५१८३ या क्रमांकावर संपर्क साधावा.