
कणकवली : खारेपाटण रिक्षा चालक - मालक संघटनेतर्फे खारेपाटण हायस्कुलनजीकच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे श्रमदानाने बुजविण्यात आले. खडीचा वापर करून हे खड्डे बुजविण्यात आले.
या श्रमदानामध्ये संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे, उपाध्यक्ष संतोष तुरळकर, सल्लागार अनिल कर्ले, राजू चव्हाण, महावीर होनाळे, प्रकाश जाधव, संतोष खांडेकर, पिंट्या शिंदे, सोमेश्वर पिसे, सुनील कर्ले, नीलेश कावळे आदी सहभागी झाले होते.