
देवगड : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ घोषीत होताच देवगड तालुका जि.प.,प.स सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग नितीन राऊत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून पथकांचा आढावा घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ घोषीत होताच देवगड तालुका जि.प.,प.स सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग नितीन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणूकीचे कामकाज सुरूळीतपणे पार पडण्याकरीता विविध प्रकारची २९ पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकात नायब तहसिलदार दर्जाचे अधिकारी पथक प्रमूख म्हणून कामाकाज पहाणार असून प्रत्येक पथकात सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी,महसूल सहायक,ग्राममहसूल अधिकारी, महसूलसेवक आणि शिपाई आदी कर्मचारी असणार आहेत.
देवगड तालुका जिपपंस सार्वत्रिक निवडणूक २०२६ सुरळीत पारपडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन राऊत यांनी प्रत्येक पथकाच्या कामकाजाबाबत सुचना देत पुर्व तयारीचा आढावा घेतला.यावेळी तहसिलदार रमेश पवार, निवासी नायब तहसिलदार विवेक शेठ, निवडणूक नायब तहसिलदार छाया आखाडे, पुरवठा निरिक्षण अधिकारी श्री.एस.डी.गुट्टे आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.










