'रिव्हर्स शोल्डर आर्थोप्लास्टी' शस्त्रक्रिया यशस्वी..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 11, 2024 14:38 PM
views 70  views

सावंतवाडी : डॉ. महेंद्र कुडचडकर व सावंतवाडीचे सुपुत्र डॉ.अमेय स्वार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या रिव्हर्स शोल्डर आर्थोप्लास्टी शस्त्रक्रिया केली. रिव्हर्स शोल्डर आर्थोप्लास्टी ही जटील सर्जरी असून गोवा राज्यात ती प्रथमच करण्यात आली. व्हिजन इस्पितळात ही सर्जरी झाली. डॉ. स्वार आणि डॉ. कुडचडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया झाली. डॉ. भाग्यश्री शेट्ये यांनी शस्त्रक्रियेवेळी रुग्णाला भूल देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. यामुळे शस्त्रक्रिया विनाअडचण यशस्वी झाली.

रिव्हर्स शोल्डर आर्थोप्लास्टी सामान्य खांदा बदलताना, जॉइंटचा बॉल मेटल इम्प्लांटने बदलला जातो, तर सॉकेट प्लास्टिकच्या घटकाने पुन्हा तयार केला जातो. सामान्य खांदा बदलताना, जॉइंटचा बॉल मेटल इम्प्लांटने बदलला जातो. तर रिव्हर्स शोल्डर आर्थोप्लास्टी सर्जरी ही एक प्रकारची रिप्लेसमेंट आहे. रिव्हर्स शोल्डर आर्थोप्लास्टी ही सामान्यतः केली जाणारी शस्त्रक्रिया नाही. परंतु, ती एक अत्यंत महत्त्वाची शस्त्रक्रिया आहे. ज्यांना खांद्याचे दुखणे आहे त्यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया फायदेशीर ठरत आहे. यामुळे खांद्याचे दुखणे बरे होण्यास मदत होते. या शस्त्रक्रियेमुळे अनेकांना फायदा होईल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.