महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी जिल्हा दौऱ्यावर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 11, 2025 19:44 PM
views 1023  views

सिंधुदुर्गनगरी :  राज्याचे  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवार दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता माजी मंत्री दिपक केसरकर, यांच्या निवासस्थानी भेट. (स्थळ:-श्रीधर अपार्टमेंट, सावंतवाडी एस.टी.डेपोसमोर, सावंतवाडी) सकाळी 10.15 वाजता मोटारीने सावंतवाडी येथून ओरोसकडे प्रयाण.  सकाळी 10.55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन. सकाळी 11 वाजता नागरीकांचे निवेदने स्विकारणे करिता राखीव.(स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस)  दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद. (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस) दुपारी 1 ते 3 वाजता जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्यासमवेत महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचा,भूमी अभिलेख विभागाचा आढावा. (स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस) दुपारी 3.15 ते 4.15 वाजता भाजपा जिल्हा कार्यालय येथे भेट (स्थळ:- ओरोस )