
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील बांदा चेक पोस्ट ते गोवा आणि आंबोली मार्गे कर्नाटक मध्ये जाणाऱ्या खडी वाळू सिलिका चिऱ्याचे गाड्या दोन ब्रासचे पास दाखवून ६ ८ १० ब्रास पर्यंत महसूल चुकवून वाहतूक करत असल्याबाबत तक्रार माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तर वेळीच सदर अनधिकृत वाहतूक न रोखल्यास दोन्ही चेक पोस्टवर गाड्या अडवून आम्ही प्रशासनास दाखवून देऊ असा इशारा श्री उपरकर यांनी दिला.
शासनाचे जिल्हाधिकारी म्हणून सर्व गौण खनिजांमध्ये मोडत असलेली वाळू चिरे खडी सिलिका यांच्यावरती कारवाई करणे व नियंत्रण ठेवणे याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिलेला असून शासन निर्णय झालेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू खडी आणि चिरे मोठ्या प्रमाणात गोवा राज्य व आंबोली मार्गे कर्नाटक राज्यात वाहतूक केली जात आहे. वाळू चिरे वाहतूक करताना एका गाडीला आपल्याकडील दोन ब्रास चा पास वापरला जातो. त्याच पास वर ६ ८ १० ब्रास वर वाळू चिरे खडी मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. याबाबत दोन ते तीन वेळा प्रत्यक्ष आपल्याशी भेटून चर्चा केली आहे. गौण खनिज वाहतूक सूर्यास्तापासून सूर्य मावळेपर्यंत वाहतूक करावयाची असताना दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाळू चिरे खडी गौण खनिज वाहतूक केली जाते. याकडे आपले खणी कर्म विभाग प्रांतअधिकारी तहसीलदार सावंतवाडी हे आर्थिक गैरव्यवहातून मोठ्या प्रमाणात गुंतले आहे. त्यामुळे वाहतूक केली जाते या सर्व अधिकाऱ्यांचे महिन्याचे हप्ते ठरलेले असून प्रत्येक अधिकारी महिन्याला १० ते २० लाख हप्ता गोळा करत आहे. शासनाच्या कोट्यावधीचा महसूल बुडवत आहेत व त्यावर नियंत्रण ठेवणे ही तुमची जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी आहे.
आपल्या गोव्याच्या सीमेवर बांदा चेक पोस्ट येते व कर्नाटकच्या सीमेवर आंबोली चेक पोस्ट येथे सीसीटीव्ही बसवलेले असताना ते सीसीटीव्ही एका कुठेतरी बाजूला असल्याने सीसीटीव्ही फुटेज मध्ये येऊ नये म्हणून दुसऱ्या बाजूने ते वाहतूक करतात याकडे पोलीस आरटीओ यंत्रणा आणि आपला महसूल यंत्रणा आर्थिक तडजोडीतून गाड्या सोडतात व त्याकडे पूर्णता दुर्लक्ष करतात. त्या गाड्या राज्याच्या सीमेवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक करतात तरी वरील महसूल चुकवेगिरी करणारे आणि सूर्यास्त नंतर सूर्योदय होण्यापूर्वी वाहतूक करतात ही वाहतूक शासन परिपत्र प्रमाणे त्वरित थांबवण्यात यावी व कमी ब्रास वापरून जास्त ब्रास वाहतूक करत असल्याने शासनाच्या महसूलची चोरी करत असलेल्या विरोधात कारवाई करण्यात यावी. अन्यथा त्या विरोधात न्यायालयात लोकआयुक्त यांच्याकडे दाद मागावी लागेल याची नोंद घ्यावी. व आंबोली मार्गे तसेच बांदा आरटीओ जवळ असलेल्या पोलिसांची देखील चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे श्री उपरकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हणाले आहेत.