
कणकवली : कणकवली पियाळी इथं ओव्हरलोड सिलिका वाळू वाहतुक करणाऱ्या चार डंपर वर महसूल विभागाने कारवाई केली आहे. कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव मंडळ अधिकारी विद्या जाधव व तलाठी यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास पिआळी येथे केली. या डंपर मध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक असल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. या चारही डंपर मधील वाळूचे मोजमाप घेऊन नंतरच त्यांच्यावर दंड आकारण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. पण अचानक झालेल्या या कारवाईमुळे कणकवली तालुक्यातील वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.