महसूल भरारी पथकाची ओव्हरलोड सिलिका वाहतुकीवर कारवाई..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 13, 2023 17:31 PM
views 104  views

कणकवली : तालुक्यातील कासार्डे उत्तर दक्षिण गावठण येथे सिलिका वाळू वाहतूक करणारे ओव्हरलोड करणाऱ्या दोन ट्रकवर महसूल विभागाने कारवाई केली. ही कारवाई कणकवली तहसीलदार आरजे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार शिवाजी राठोड मंडळ अधिकारी संतोष नागावकर यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा केली. यामध्ये दोन्ही ट्रकवर मिळून 16069 रुपये दंड आकारण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी चार ओव्हरलोड सिलिका वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यात आली होती. आणि आताही पुन्हा कारवाई करण्यात आल्याने वाळू व्यवसायिकांचे धाबे दणानले आहेत.