परतीच्या चाकरमान्यांना रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका...!

प्रवाशांना भोगाव्या लागतत आहेत नाहक यातना | स्वच्छतागृह बंद असल्याने महिलांचे होत आहेत हाल
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 01, 2023 14:56 PM
views 1077  views

कुडाळ : गणेशोत्सव काळानंतर मुंबईच्या दिशेने रवाना झालेला चाकरमानी रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका बसला आहे. कुडाळ रेल्वे स्थानकावर मुंबईच्या दिशेने रवाना होणारे चाकरमाने ताटकळत बसले असून काही रेल्वे रद्द झाल्याने व काही रेल्वे उशिरा येत असल्याने प्रवासी वैतागले आहेत.

दुसरीकडे कुडाळ रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने स्वच्छतागृहाचे हे काम नव्याने सुरू करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना अपंगांसाठी असलेल्या स्वच्छतागृहा समोर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. यामुळे महिला प्रवाशांचे ही प्रचंड हाल झाले आहेत.

कुडाळ रेल्वे स्थानकावर अर्धवटच  असलेल्या छपराचा कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्रास सहन करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने कुडाळ रेल्वे स्थानकावर पूर्ण छपराची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांकडून व्यक्त केले गेले आहे. रेल्वे प्रवासी तब्बल तीन तासाहून अधिक काळ स्थानकावर उभे असूनही स्तनदा माता, अपंग प्रवासी, वृद्ध प्रवासी, गरोदर महिला, यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. मात्र या प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त केली गेली आहे.