
कुडाळ : रस्त्याच्या मागणीसाठी दोघासेवानिवृत्त शिक्षकानी रहिवाशांसह कॉलनी उपोषण करून लक्ष वेधले ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत अणावकर आणि प्रकाश सावंत या दोघांनी कॉलनीतील सुविधा पूर्ण करण्यासाठी हे लक्षवेधी आंदोलन केले यामध्ये
रस्त्याची झालेली दुर्रदशा, अर्धवट गटार आणि माघी गणेश कॉलनी ते संकल्प नगर जोड रस्ता या दुर्लशित कामाकडे लक्षवेद करण्यासाठी धरणे आंदोलन हायवे ते माघी गणेश कॉलनी रस्त्यासाठी १० लाख रु. हर झाले त्यापैकी ४ लाख ३६ रु. खर्च झाले उर्वरित ५,९९,९६४ रु. गेले कुठे ? असा सवालआंदोलनकर्ते चंद्रकांत अणावकर, प्रकाश सावंत यांनी केला. या चाललेल्या भोंगळ कारभाराविरुद्ध या ज्येष्ठ नागरिकांना उपोषण करावे लागले आहे. रस्ता करण्यासाठी देखील उपोषण करावे लागले आणि रस्ता झालेला निकृष्ट दर्जाच्या यासाठी देखील उपोषण करावे लागले आहे ही आजकाल चालणाऱ्या शासकीय कामांची व्यथा आहे. काम घेतलेल्या ठेकेदार हा एक काम योग्यरीतीने करतो की नाही हे पाहण्याची शासनाची जबाबदारी राहिलीच नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे.