सेवानिवृत्त शिक्षिका विरजीन वेरोनिका ऊर्फ निकामोंतेरो यांचे निधन

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 26, 2023 13:05 PM
views 428  views

सावंतवाडी: तांबळ गोठण, माजगाव येथील श्रीमती विरजीन वेरोनिका ऊर्फ निकामोंतेरो, (वय 67 वर्षे) यांचे शनिवार दि. 24/02/2023 रोजी रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी गोवा येथील व्हिजन हॉस्पीटल येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 3 मुली, नातवंडे, भाऊ, बहिनी असा परिवार आहे.

गोव्यात त्यांनी शिक्षिका  म्हणून काम करून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांचे मालवण टोपीवाला हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण झाले होते. मनमिळावू शिक्षिका म्हणून त्या प्रसिद्ध होत्या व विद्यार्थी प्रिय म्हणून त्या ओळखल्या जायच्या. म्हापसा गोवा येथील समाजसेवक व समाजवादी नेते कॅजिटन परेरा, जॉनी परेरा व महाराष्ट्र बँकेचे सेवानिवृत कर्मचारी पॉली परेरा यांच्या त्या भगिनी होत. मिलाग्रीस शाळेच्या शिक्षिका सौ विल्मा क्रूज फर्नांडीस यांच्या त्या आई होत.

सोमवारी दिनांक 27/02/2023 रोजी संध्याकाळी 3:30 वाजता सावंतवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.